Shantaram nandgaonkar biography channels

Shantaram Nandgaonkar : 'आश्विनी ये ना' ते ‘रुपेरी वाळूत'; एव्हरग्रीन गाण्यांचे गीतकार शांताराम नांदगावकरांचा स्मृतीदिन, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

शांताराम नांदगावकर (Shantaram Nandgaonkar ) यांचा आज 12 वा स्मृतीदिन आहे. जाणून घ्या त्यांच्या पहिल्या कवितेचा किस्सा आणि त्यांची हिट गाणी

By : एबीपी माझा वेब टीम | Edited By: प्रियांका कुलकर्णी | Updated at : 12 Jul 2022 04:54 PM (IST)

Shantaram Nandgaonkar

Shantaram Nandgaonkar : प्रसिद्ध कवी आणि गीतकार शांताराम नांदगावकर (Shantaram Nandgaonkar) यांचा आज 12 वा स्मृतीदिन आहे.

आपल्या कवितांनी आणि भावगीतांनी शांताराम यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. शांताराम यांनी मराठी चित्रपटांसाठी देखील गाणी लिहिली. शांताराम यांचा जन्म कोकणातील कणकवली येथील नांदगाव येथे झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईमधील परळ येथे रहायला आले. त्यांचे शिक्षण मुंबईमधील परळ येथील  शिरोडकर हायस्कुलमध्ये झाले. 

हिट चित्रपटांमधील गीतांचे लेखन
शांताराम नांदगावकर यांनी अनेक हिट चित्रपटांमधील गीतांचे लेखन केलं आहे.

अशी ही बनवाबनवी, गंमत जंमत, तू सुखकर्ता, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, अष्टविनायक आणि पैजेचा विडा या मराठी चित्रपटांमधील गाण्यांचे लेखन शांताराम नांदगावकर यांनी केले आहे. 

पहिल्या कवितेचा किस्सा 
एका मुलाखतीमध्ये शांताराम नांदगावकर यांनी त्यांच्या पहिल्या कवितेचा किस्सा सांगितला होता.

ते म्हणाले, 'मी पहिली कविता इयत्ता दहावीत असताना केली. मी देवा समोर दिवा लावून आभ्याला सुरुवात करायचो.

Pics of richard hesson wife kim lexus

मला दिव्याच्या ज्योतीबाबत आकर्षण वाटत होतं. त्यावेळी मला वाटायचे की शायर किंवा कवी हे दिव्यामधील ज्योतीबद्दल चुकीचे लिहितात.

Gunther von hagens anatomy for beginners

'शमा जले परवाने आये', असं तेव्हाचे शायर म्हणत होते, ते मला आवडतं नव्हते. एकदा मी शाळेतील मुलांसोबत सिनेमा बघायला गेलो. मराठी सिनेमा शाहीराच्या जीवनावर होता. त्यामध्ये देखील त्या शाहीरानं ज्योतीबाबत केलेलं वर्णन मला आवडलं नाही. तेव्हा माझे मित्र मला म्हणाले, शांताराम तू या कल्पनेवर चांगली कविता लिही. शाळेचा आभ्यास करताना मला दिव्याच्या ज्योतीवर कविता सुचली.

'का उगा पतंगा जळसी?' ही कविता मी तेव्हा लिहिली. ही माझी पहिली कविता.'

राजकारणत देखील सक्रिय
1985 मध्ये शांताराम यांनी शिवसेना पक्षाच्या तिकिटावर महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक लढली होती. या निवडणूकीमध्ये त्यांना यश मिळाले होते. 

प्रसिद्ध गीते
अशी नजर घातकी बाई, अशीच साथ राहू दे, अश्विनी ये ना, अष्टविनायका तुझा महिमा कसा, रुपेरी वाळूत असाच यावा पहाटवारा, इवले इवले जीवही येती, गा गीत तू सतारी ही शांताराम यांची गाजलेली गीते आहेत.

अल्झायमरमुळे 11 जुलै 2009 रोजी शांताराम यांचे निधन झाले.  

हेही वाचा:

Shantaram Nandgaonkar : कविवर्य शांताराम नांदगावकरांचा 12 वा स्मृतीदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न

अधिक पाहा..

कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय

गुडन्यूज !

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू

माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'

दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी

Copyright ©kidfowl.e-ideen.edu.pl 2025